संघटना मजबूत करण्यासह शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे राजेश फलके यांचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी पिंपरी विधानसभा क्षेत्रातील संत तुकाराम नगर प्रभाग क्रमांक २० येथे आयोजित करण्यात आलेली ‘घोंगडी बैठक’ टप्पा ०८ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्षाचा विस्तार, युवकांना संघटनेशी जोडणे आणि शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीला शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश किसनराव फलके आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख सागर पाचर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती. युवासेनेचे महानगरप्रमुख संतोष म्हात्रे तसेच प्रभाग क्रमांक २० मधील शिवसेना आणि युवासेनेच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीचे नियोजन केले.

यावेळी युवतीसेनेच्या शहरप्रमुख श्वेता कापसे, शिवसेना सोशल मीडियाच्या शहरप्रमुख तेजश्री ढोरे-पाटील, शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख गणेश जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या उपशहरप्रमुख स्वीटी मलातपुरे, भोसरी विधानसभा समन्वयक विद्यासागर गायकवाड, युवासेनेचे विभागप्रमुख चांद पटेल, नीलम म्हात्रे, मनीषा वाघमारे, सागर चव्हाण, अमित फलके, राज काची, निलेश मलातपुरे आणि युवासेनेचे पिंपरी विधानसभा संपर्कप्रमुख राजीव मेनन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बैठकीदरम्यान संघटनेचा विस्तार करणे, पक्षाची विचारधारा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, अधिकाधिक युवकांना आणि नागरिकांना शिवसेनेशी जोडणे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन..
नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना योजनांचा प्रभावीपणे लाभ मिळवून देणे, जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणे आणि शिवसेनेचे कार्य प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे महानगरप्रमुख राजेश फलके यांनी सांगितले. संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करत ही घोंगडी बैठक उत्साहात संपन्न झाली.

















Join Our Whatsapp Group