पिंपरी (Pclive7.com):- विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त आकुर्डी येथे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि वीर हनुमान यांच्या भव्य मिरवणुकीसह रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.

या भव्य मिरवणुकीची सुरुवात आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होणार असून, गणेश कामगार मंदिर, दत्त मंदिर मार्गे मिरवणूक मल्हारराव कुटे क्रीडांगण येथे पोहोचणार आहे. त्यानंतर ट्रिनिटी शाळेजवळील कै. मल्हारराव कुटे क्रीडांगण, विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे रावण दहन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

विजयादशमी हा असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचा संदेश देणारा सण आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मिरवणूक व रावण दहन सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सदस्य प्रमोद प्रभाकर कुटे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group