पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाबाहेर झालेल्या वादातून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गौरव उमेश गुप्ता (वय २०, व्यवसाय-शिक्षण, रा. सुदर्शन चौक, पवना मित्र मंडळ, पिंपरीगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साहिल मनोहर, लकी जावळे, राकेश मोघेड, सागर गायकवाड (रा. भोसरी) आणि निशांत अहिरे (रा. पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गौरव गुप्ता हे महात्मा फुले महाविद्यालयात टीव्ही वाय-फाय कॉमर्सचा पेपर देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मित्र साकिब अत्तार हा गाडीवरून पेपरसाठी महाविद्यालयात आला होता. पेपर संपल्यानंतर महाविद्यालयाबाहेर गाडी लावत असताना साहिल मनोहर याने फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर लकी जावळे याने फिर्यादीला, “तुला फार खूप मस्ती आली आहे का?” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर इतर आरोपींनीही फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यावेळी फिर्यादीचा मित्र साकिब अत्तार हा त्यांना वाचवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या हातातील रॉडने त्यांच्या मोबाइलवर मारून मोबाइलचे नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.


















Join Our Whatsapp Group