भक्ती, श्रद्धा आणि मंगलमय ऊर्जेचा दिव्य संगम..!
पिंपरी (Pclive7.com):- भव्य नवरात्रोत्सव २०२६ अंतर्गत सातव्या माळेच्या पावन पर्वानिमित्त लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळ, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजित १६ कुलस्वामिनी व कानुबाई मातेचा जागर आणि होमहवन सोहळा अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

वैदिक मंत्रोच्चार, पवित्र अग्नीत अर्पण केलेल्या आहुती आणि १६ कुलस्वामिनी व कानुबाई मातेच्या भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. मनोजजी ब्राह्मणकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याची सुरुवात होमहवनाने झाली. त्यानंतर पालखीचे आगमन, देवीचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणाने कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. समाजातील एकोपा, परंपरांचे जतन आणि कुलस्वामिनी मातेच्या भक्तीत रमण्याचा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

या मंगलमय कार्यक्रमाला ‘देऊळबंद-२’चे निर्माते आदरणीय कैलास वाणी आणि नामांकित सनदी लेखापाल सी.ए. निलेश येवलेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच आमदार शंकर जगताप, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेविका रेश्मा भुजबळ, अर्चना तापकीर, योगिता बारणे, अरुण वाणी, नगरसेवक नाना काटे आणि पुणे विवाह परिचय संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र महालपुरे, संजय भामरे, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

सोळा कुलस्वामिनी मातेच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत समाजबंधू-भगिनींनी देवीच्या जयघोषात आणि गरब्याच्या तालावर उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. पारंपरिक वेशभूषा, उत्साहाने भरलेले वातावरण आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण सोहळा अधिकच रंगतदार झाला.
कानुबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुपच्या सादरीकरणासह सागर देशमुख यांच्या सुमधुर गायनाने कार्यक्रमात भक्ती आणि आनंदाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. ५६ भोगांची आरती, गवळण, गरबा आणि कानुबाई मातेच्या भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी आयोजित पैठणी लकी ड्रॉ अंतर्गत विजेत्या समाजभगिनींचा आनंद आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महिला अध्यक्ष सौ. प्रितीताई कोठावदे, स्वाती अमृतकर, योगिता फुलदेवरे, माधुरी वाणी, सोनल बधान, माधवी भामरे, वृषाली बोरसे, मंडळाचे सचिव श्री सचिन सोनकुळ, निलेश कोठावदे, प्रितम येवले, विनायक अमृतकर,शशांक शिरुडे, विनोद कोठावदे, योगेश फुलदेवरे, राजु येवले,सुयश बधान, ललित सोनजे, दीपक कोठावदे, प्रकाशजी येवले, योगेश अमृतकार आणि राजेंद्रजी पुरकर , दिनेश कोठावदे, विजय बागडे, सचिन अमृतकर,रुपेश शिनकर , बाळकृष्ण अमृतकर, माऊली येवले,तुषार सोनगिरे, तुषार भामरे, राहुल वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढविणाऱ्या सर्व समाजबांधवांचे उपाध्यक्ष गोकुळ सोनजे आणि अमोल येवले यांनी आभार मानले.
आई कुलस्वामिनी मातेच्या जोगव्याने या भक्तिमय सोहळ्याची भावपूर्ण सांगता झाली.
देवीच्या कृपेने सर्वांच्या जीवनातील नकारात्मकता दूर होवो, प्रत्येकाच्या मनात धैर्य व आत्मबळ निर्माण होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान व समृद्धी नांदो, हीच सोळा कुलस्वामिनी मातेच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!

















Join Our Whatsapp Group