पिंपळे सौदागर (Pclive7.com):- सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून पिंपळे सौदागर येथील श्री संत ज्ञानेश्वर ब्राह्मण संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी दिव्यांगांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांची खरेदी करुन त्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत केली. गुरुवार दि. २२ रोजी स्व. बाळासाहेब कुंजीर क्रिडांगणाच्या परिसरात झालेल्या मासिक सभेत हा उपक्रम राबविण्यात आला.

दिव्यांगांच्या हितासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी नाशिकच्या सक्षम या संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. आकाश कंदिलांची निर्मिती हा त्यापैकीच एक उपक्रम असून अतिशय अल्प दरात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आकाशकंदिलांची खरेदी करुन दिव्यांगांना मदत करावी असे आवाहन सक्षम संस्थेचे पिंपरी चिंचवड येथील प्रमुख राजा पटवर्धन आणि त्यांचे सहकारी राजेंद्र देशमुख यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मासिक सभेसाठी उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर आकाश कंदिलांची खरेदी केली.

सदरील मासिक सभेचा प्रारंभ संत ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिमा पूजन आणि दिपप्रज्वलनाने करण्यात आला. त्यानंतर मीनाक्षी कुलकर्णी आणि सुरेखा कुलकर्णी यांनी आदिमाया आदिशक्ती देवीचा महिमा वर्णन करणारे स्तुतीगीत सादर केले. विलास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात रमेश भट यांनी

प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व सदस्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा चिंचवडकर यांनी केले तर अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.

















Join Our Whatsapp Group