पिंपरी (Pclive7.com):- ऑनलाइन शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळविण्याचे आमिष दाखवत एका महिलेची ४८ लाख ८८ हजार ८५ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. टेलिग्रामवरील शेअर मार्केट ग्रुपमध्ये सहभागी करून विविध बँक खात्यांवर पैसे स्वीकारण्यात आले. ही घटना ७ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुनावळे येथील बांदलनगरमध्ये घडली.

पुनावळे परिसरातील ३५ वर्षीय महिलेने याप्रकरणी शुक्रवार (दि. २३) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विल्यम अॅनालिस्ट नावाने संपर्क साधणारी व्यक्ती, टेलिग्रामवरील एक महिला, कस्टमर केअरच्या नावाने संपर्क करणाऱ्या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संशयितांकडून फिर्यादी महिलेशी टेलिग्रामवरून संपर्क साधण्यात आला. त्यांना ‘शेअर मार्केट ए-०३’ या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर ऑनलाइन शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

संशयितांनी महिलेचा विश्वास संपादन करून विविध बँक खात्यांवर आरटीजीएस आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण ४८ लाख ८८ हजार ८५ रुपये स्वीकारले. मात्र, गुंतविलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे


















Join Our Whatsapp Group