राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांच्या सर्व राजकीय गणितांना धक्का देत २५ वर्षांनी कर्जत नगरपालिकेत शिवसेनेने परिवर्तन घडवून आणले आहे. निवडणुकीत शिवसेनेने ६, भाजपने ४ जागांवर यश मिळवले. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागांवर समाधान मानावे लागले.
कर्जत नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना धोडीपछाड करत सत्ता काबीज केली आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी याही २६०९ विजयी झाले आहेत. कर्जत नगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या एकूण १८ जागांसाठी निवडणुकीत ४५ उमेदवार निवडणूक लढवत होते.
कर्जत नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची २५ वर्ष एकहाती सत्ता होती. महत्ताचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रणिती लाड ही थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निवडणुकीत उतरल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा मतदार लाडाचे ‘लाड’ करणार का? अशी चर्चा होती. मात्र, मतदारांनी लाडसह राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले.