पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि.९ रोजी पिंपरी चिंचवड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली आहे.
शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार दि.९ मार्च रोजी १३ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त मुंबईसह राज्यभर सर्वत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातही त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.९ रोजी सकाळी ११ वाजता यमुनानगर येथील अंपग शाळेत धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर चिखली येथील विकास बाल आश्रम शाळेतील अनाथ मुलांना जेवण देण्यात येणार आहे. तसेच आकुर्डी महापालिका रूग्णालयातील रूग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.
रविवार दि.१० रोजी संध्याकाळी ६.३० वाजता यमुनानगर येथील माता मठ येथे सर्व पत्रकार, मनसैनिक, पदाधिकारी यांच्या चहा पानचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेना, महिला सेना, वाहतुक सेना, चित्रपट सेना, तसेच शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यावतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.