पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर हे स्मार्ट आहेच, त्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी व प्रदुषणमुक्त पिंपळे सौदागरसाठी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका शितल काटे, उषा वाघेरे यांच्या हस्ते ‘ई स्कूटर’ सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिरो लिप कंपनी यांच्या विद्यमाने स्मार्ट सिटी अंतर्गत प्रथमच पिंपळे सौदागर येथे ई स्कूटर सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
ही स्कूटर पर्यावरणपूरक आहे, त्यामुळे प्रदुषणाला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रवासासाठी या ‘ई स्कूटर’चा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा व पर्यावरणाला हातभार लावावा असे आवाहन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितलताई नाना काटे यांनी केले.
यावेळी स्कूटरच्या लीप कंपनीचे हार्दिक रिजवाणी यांनी या स्कूटरच्या वैशिष्ट्याविषयी माहिती दिली.
ही स्कूटर Android App चालू किंवा बंद करता येते.ई स्कूटर चालविण्यासाठी प्रथम १५ मिनिटे फ्री राईड असेल, त्यानंतर प्रत्येक मिनिटाला १.५० रुपये आकारले जातील, पैसे अदा करण्यासाठी UPI अॅप्स चा वापर करता येतो.
ई स्कूटर विजेवर चालत असल्यामुळे बॅटरी ४ ते ५ तास चार्ज करावी लागते. एकदा चार्ज केल्यानंतर ६० किलोमीटर पर्यंत चालवता येते. ई स्कूटरची गती २५ किलोमीटर प्रती तास आहे.याचा चार्जिंग पॉइंट गणेशम सोसायटी जवळील BRT पार्किंग मध्ये करण्यात आली आहे. अशी माहिती रिजवाणी यांनी दिली.
यावेळी लेखिका अनिता धनंजय भिसे यांनी लिहीलेली पुस्तके अमेझिंग अमेरिका, चौकट शोध सुखाचा, शब्दांची फुले, अॉसम ऑस्ट्रेलिया तसेच अनेक पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. तसेच त्यानी बी.एस्सी, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, डी.सी.एम,.एम.ए.अशा अनेक पदव्या मिळविल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच वैशाली अरणकल्ले यांची पिंपरी चिंचवड शहर स्वयं रोजगार व बचत गटाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा सौ.पुष्पा संचेती, सौ.मीनाक्षी उंबरकर, तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






















Join Our Whatsapp Group