पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट संघटनेच्या वतीने शहरात प्रथमच वरिष्ठ महिला खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ पासून प्रारंभ होणार असून, स्पर्धेची सांगता २३ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.

या स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी, एसएसए क्रिकेट अकॅडमी, क्विक फिट क्रिकेट अकॅडमी, एस. पी. राठोड इलेव्हन, स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी, लक्ष क्रिकेट अकॅडमी, एमबीसीएस क्रिकेट संघ आणि मॅव्हरिक्स क्रिकेट क्लब असे आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे सामने सुरुवातीला साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार असून, त्यानंतर बाद फेरीचे सामने होतील.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये रोख व चषक, तर उपविजेत्या संघाला १० हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अष्टपैलू खेळाडू यांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूलाही पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी व सचिव राजू कोतवाल यांनी माहिती दिली.

















Join Our Whatsapp Group