पिंपरी (Pclive7.com):- दिवाळीतील बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर यादव परिवाराच्या वतीने गाई, म्हशी आणि बैलांचे पूजन उत्साहात करण्यात आले. पूर्वजांनी सुरू केलेला दूध व्यवसायाचा वारसा आज तिसरी पिढीही तितक्याच निष्ठेने पुढे चालवत असून, पशुधनावरील प्रेम आणि ग्रामीण संस्कृतीची परंपरा यादव परिवाराने आजही जपली आहे.

यादव परिवाराच्या दूध व्यवसायाची मुहूर्तमेढ आजोबा कै. नथू खंडू यादव यांनी रोवली. अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी या व्यवसायाची उभारणी केली. दूध व्यवसाय हाच परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार होता. त्यानंतर कै. सुदाम नथू यादव, किसन आप्पा यादव, लालचंद नथू यादव आणि कै. गुलाब नथू यादव यांनीही हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले. पूर्वजांच्या मेहनतीच्या जोरावर यादव परिवाराने दूध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली. त्याचबरोबर अन्य उद्योग-व्यवसायांमध्येही आपला ठसा उमटवला. आज दुसऱ्या पिढीने उभा केलेला हा वारसा तिसरी पिढीही अभिमानाने जपत आहे.

सध्या गणेश किसन (आप्पा) यादव, पप्पू सुदाम यादव आणि निलेश लालचंद यादव हे दूध व्यवसायाची परंपरा पुढे नेत आहेत. विशेष म्हणजे, दूध व्यवसायासोबतच बैलगाडा शर्यतीची आवड आणि परंपराही त्यांनी कायम जपली आहे. आधुनिक काळातही पशुधनाशी असलेले नाते आणि ग्रामीण संस्कृतीचे संस्कार त्यांनी टिकवून ठेवले आहेत. बलिप्रतिपदेच्या निमित्ताने संपूर्ण यादव परिवार एकत्र आला. गोठ्यातील गाई, म्हशी आणि बैलांना सजवून त्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. पशुधनाला नैवेद्य खाऊ घालत परिवारातील सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पूर्वजांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.

बलिप्रतिपदेच्या निमित्ताने संपूर्ण यादव परिवार एकत्र आला. गोठ्यातील गाई, म्हशी आणि बैलांना सजवून त्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. पशुधनाला नैवेद्य खाऊ घालत परिवारातील सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पूर्वजांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.
“पशुधन हे आमच्यासाठी केवळ व्यवसायाचे साधन नसून आमच्या परिवाराच्या कष्टाचे, संस्कारांचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. पूर्वजांनी घाम गाळून उभा केलेला दूध व्यवसायाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत असाच अखंड सुरू ठेवणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे,” अशी भावना यादव परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
बलिप्रतिपदेच्या निमित्ताने यादव परिवाराने जपलेली ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, पूर्वजांचे कष्ट, पशुधनाविषयीची कृतज्ञता आणि पिढ्यान्पिढ्या जपल्या जाणाऱ्या संस्कारांची साक्ष देणारी ठरली.


















Join Our Whatsapp Group