पिंपळे सौदागर (Pclive7.com):- राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर) उन्नतीच्या प्रांगणात हा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला.

पिंपळे सौदागर परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पिंपळे सौदागर प्रभागाच्या नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, पराग त्यागी, बाळकृष्ण चौधरी, सफाई कामगारांचे प्रतिनिधी मिलिंद नाईक आणि भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे आणि संजय भिसे यांच्या हस्ते सर्व सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उन्नती सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा गौरव करत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.


















Join Our Whatsapp Group