पिंपरी (Pclive7.com):- लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने रविवार, दि.८ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे मेट्रोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नागरिक आणि प्रवाशांच्या आग्रहाला प्रतिसाद देत पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रो सेवा दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी मेट्रो रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

यापूर्वी रविवारी पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असणार होती. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात नागरिकांना प्रवासाची अधिक सुविधा मिळावी, यासाठी सेवेत दोन तासांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, रविवार, ८ नोव्हेंबर रोजी पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील. रात्री ८ ते ११ या वेळेत मेट्रो सेवा बंद असेल.

दरम्यान, सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ पासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.


















Join Our Whatsapp Group