पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयात अभिवादन करण्यात आले होते.

यावेळी भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा महामंत्री मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, नगरसेवक निखिल बोऱ्हाडे, चंद्रकांत नखाते, भाजप प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे, संतोष तापकीर, देवदत्त लांडे, रवींद्र देशपांडे, दिलीप राऊत, रवींद्र नांदुरकर, रामदास काळजे, संजय परळीकर, मनीष पंजाबी, नंदूकाका भोगले यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

















Join Our Whatsapp Group