निगडी (Pclive7.com):- दिवाळी सणाचा आनंद समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा आणि वंचित घटकांच्याही जीवनात आनंदाचे क्षण फुलावेत, या सामाजिक भावनेतून अनुप मोरे फाउंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अनुप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सेक्टर २२ मधील अंध व्यक्ती, निगडी अमरधाम स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी चहा व नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमातून समाजातील दुर्लक्षित घटकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन काळभोर (भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, पिंपरी-चिंचवड शहर), राजेंद्र लक्ष्मण काळभोर, राजू शेख, हैदर शेख, सलीम मुकरताल, नाना गिसरे, रवी सवणे, महेश मगर, पप्पू हतागळे, विकास कांबळे, जयदेव भुवड, जगदीश चौधरी, फुआराम चौधरी, रफिक शेख, अविनाश साळवे, अविनाश वाघमारे आणि अकम भाई शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम उत्साहात पार पडला.


















Join Our Whatsapp Group