पिंपरी (Pclive7.com):- लक्ष्मीपूजनाच्या सणाचा उत्साह आणि आनंद शहरात सुरू असतानाच आगीच्या घटनांनी अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ उडवली. लक्ष्मीपूजनाच्या रात्री पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी आगीच्या तब्बल ५० घटनांची नोंद झाली. फटाक्यांमुळे तसेच अन्य कारणांमुळे या आगी लागल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या एकूण ५० घटनांपैकी सर्वाधिक २५ घटना मोकळी मैदाने, गवत, कचरा आणि झाडांना आग लागण्याच्या होत्या. तर २० ठिकाणी फ्लॅट आणि घरांना आग लागल्याच्या घटना घडल्या. याशिवाय ५ ठिकाणी फ्लेक्स, कंपाउंड आणि टॉवरला आग लागल्याचे समोर आले.

लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना आगीच्या घटना घडल्याने अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरांना आणि फ्लॅटला आग लागल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आणि वेळेत केलेल्या कारवाईमुळे सर्व ५० घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, दिवाळीच्या आनंदोत्सवात घडलेल्या या घटनांमुळे फटाके फोडताना तसेच दिवे आणि विद्युत रोषणाई करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

















Join Our Whatsapp Group