पिंपरी (Pclive7.com):- दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही सणाचे आनंद हिरावले जाऊ नयेत, या सामाजिक भावनेतून आमदार अमित गोरखे यांनी दापोडी परिसरातील गरजू कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी गरजू कुटुंबांना दिवाळीचे साहित्य आणि किराणा सामानाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

दिवाळीनिमित्त आमदार अमित गोरखे यांनी दापोडी परिसरातील गरजू कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी केवळ मदतसाहित्याचे वाटप न करता त्यांनी कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेत सणासुदीच्या काळात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला.

समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे, त्यांना आधार देणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. या भावनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिवाळीचा आनंद अनुभवता आला.

लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामांसोबतच समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे महत्त्वाचे आहे. दिवाळीचा खरा प्रकाश हा केवळ पणत्यांच्या रोषणाईत नसून दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यात आहे, हा संदेश आमदार अमित गोरखे यांच्या या उपक्रमातून देण्यात आला.

















Join Our Whatsapp Group