भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वतीने विशेष उपक्रम; रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
पिंपरी (Pclive7.com):- दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पर्वानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांना अनोख्या पद्धतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. “Miss You दादा’.. कामाचा माणूस” हा भावनिक संदेश देत अजितदादांचे भव्य छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले.

विविध रंगांच्या आकर्षक छटांचा वापर करून साकारलेल्या या भव्य रांगोळीत स्वर्गीय अजितदादा पवार यांचे छायाचित्र साकारण्यात आले होते. रांगोळीभोवती आकर्षक नक्षीकाम आणि दिव्यांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या कलाकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या उपक्रमातून त्यांच्याविषयी असलेले प्रेम, आदर आणि जिव्हाळा व्यक्त करण्यात आला. ‘Miss You दादा’ या संदेशातून त्यांच्या आठवणी आजही जनमानसात जिवंत असल्याची भावना व्यक्त होत होती. या भव्य रांगोळीला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाची परिसरात विशेष चर्चा रंगली.
















Join Our Whatsapp Group