
पिंपरी (Pclive7.com):- प्रत्येक सणाला पोलीस आपले कर्तव्य बजावत रस्त्यावर उभे असतात. म्हणून आपण आनंदाने आणि सुखाने दिवाळी साजरी करू शकतो, पोलीसांच्या याच कर्तव्यभावनेची जाण राखून पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनने चिंचवड पोलीस स्टेशन येथे पोलीसांना मिठाई वाटून दिवाळीचा सण साजरा केला.

दिवाळीसह प्रत्येक सणाला पोलीस आपल्या कुटूंबापासून दूर राहून कर्तव्य बजावत असतात. अनेकदा ऊन पाऊस याची तमा न बाळगता ते रस्त्यावर उभे असतात. अशावेळी त्यांना देखील आपल्या कुटूंबासोबत दिवाळी साजरी करावीशी वाटते पण कर्तव्यभावनेमुळे त्यांना काम करावे लागते. त्यांच्या याच कर्तव्यनिष्ठतेची जाण ठेवून आजच्या या दिवाळीचा सण पोलीस बांधवांना मिठाई वाटून साजरा करण्यात आल्याचे संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ द. चिंचवडे यांनी सांगितले.

यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर साहेब, शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष कमलजित सिंग,राकेश सायकर, विजय महाजन, संग्राम लाड, रामय्या हिरेमठ आदि उपस्थित होते.


















Join Our Whatsapp Group