गुन्हे शाखा, युनिट २ व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीसांची संयुक्तीक कारवाई
देहूरोड (Pclive7.com):- इंदोरी गावाजवळ २० मे २०१९ रोजी जबरी चोरी करून एका कँब चालकाचा खुन झाला होता. त्या खूनाचा तपास करण्यात पोलीसांना यश मिळाले असून खून करुन पसार झालेल्या दोन आरोपींना नागपुर येथुन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व ३१ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. वैभव उर्फ पिंटु धनराज बिजेवार (वय-३३ वर्षे रा. रामदास पेठ, लेन्डा पार्क, प्लाट क्र 247, हनुमान गल्ली नागपुर) व दिगंबर उर्फ अक्षय मधुकर मेश्राम (वय-२५ वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, मोर्शी अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा, युनिट २ व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीसांनी संयुक्तीकरित्या ही कारवाई केली.
इंदोरी गावाजवळ २० मे २०१९ रोजी जबरी चोरी करून खुन करुन आरोपी पसार झाले होते. या गुन्ह्यातील मयत इसम याची ओळख पटत नसल्याने पोलीस आयुक्तांनी सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा, युनिट २ व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांच्याकडे संयुक्तरीत्या दिला. तपासादरम्यान यातील अनोळखी मयत ओला गाडीवर ड्रायव्हर असल्याचे व त्याचे नाव ज्ञानेश्वर किसन वरबडे असल्याचे समोर आले. मयत चालवित असलेल्या ओला कॅबचा गाडीचा शोध घेतला असता त्याची गाडी सावरदरी ता.खेड जि.पुणे येथे मिळुन आली. सदर गाडीमधील ओला कॅब बुकींग टॉबलेटचे आधारे आरोपी निष्पन्न करण्यात पोलीसांना यश आले.
आरोपींचे ठाव ठिकाण्याबाबत तांत्रिक विश्लेषणावरुन माग घेतला असता आरोपी हे प्रथम दिल्ली येथे गेल्याचे व नंतर नागपुर येथे आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखा, युनिट २ व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांचे संयुक्त पथक नागपुर येथे रवाना करण्यात आले. सदर पथकाने शिताफीने आरोपी वैभव उर्फ पिंटु धनराज बिजेवार (वय-३३ वर्षे रा. रामदास पेठ, लेन्डा पार्क, प्लाट क्र 247, हनुमान गल्ली नागपुर) व दिगंबर उर्फ अक्षय मधुकर मेश्राम (वय-२५ वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, मोर्शी अमरावती) यांना नागपुर येथून ताब्यात घेतले. आरोपीतांकडुन गुन्हयामध्ये वापरण्यात आलेले २ देशी बनावटीचे गावठी कट्टे, ३१ जिवंत काडतुसे व एक लोखंडी चाकु जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यांनी ज्ञानेश्वर किसन वरबडे याचा खुन जबरी चोरी करण्याकरीता केला असुन आरोपींनी मयताचे ए.टी.एम. मधुन १३ हजार ५०० रूपये काढल्याचे समोर आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, विनायक ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-२ चे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहा पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, सहा पोलीस निरीक्षक साधना पाटिल व पोलीस कर्मचारी मयुर वाडकर, प्रशांत सोरटे, सुधीर वाडीले, नितीन तारडे, नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, एकनाथ कोकणे, फारुक मुल्ला, प्रविण देळे, नारायण जाधव, संदिप ठाकरे, संजय गवारे, हजरत पठाण, सतीश कुदळे, तुशार शेटे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group