पिंपरी (Pclive7.com):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९४ वी जयंती राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठाण रूपीनगर तर्फे शहरातील समाजाने आर्दश घ्यावा अशी साजरी करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक व समाज बांधवाच्या मदतीने दोन गुंठे जागा घेण्यात आली. त्या जागेवर समाजासाठी सांस्कृतिक सभागृह व सार्वजनिक दवाखाना बांधण्यात येणार आहे. शहरात एवढा मोठा समाज असताना समाजाचे शहरात सभागृह नव्हते. या कार्यची दखल ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेश व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड शहर तर्फे पदाधिकारी यांचे कौतुक व सत्कार प्रदेश अध्यक्ष प्रविण काकडे सर यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन वाघमोडे, उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, संघटक राजेद्र सोनटक्के, खजिनदार संजय रूपनवर यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष हिराकांत गाडेकर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष दिपक भोजने, संपर्कप्रमुख नागनाथ वायकुळे, उपाध्यक्ष धनंजय गाढे, हनमंत मोटे, सुखदेव नरळे, पिंटु वाघमोडे व इतर पदाअधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group