पिंपरी (Pclive7.com):- महायुतीमध्ये पिंपरी विधानसभेची जागा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आरपीआय) च्या वाट्याला आहे. परंतू जागा वाटपात ही जागा शिवसेनेला सुटल्यास सेनेच्या उमेदवारा आम्ही प्रचार करणार नाही असा इशारा आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी दिला आहे.
सुरेश निकाळजे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलयं की, आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीयं. अवघ्या २९ दिवसांवर निवडणुक येऊन ठेपलीयं. राज्यात शिवसेना-भाजपा युतीच्या जागा वाटप अद्याप झालेले नाही. पिंपरी विधानसभा मतदार संघाची जागा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (A) ला सुटलीच पाहिजे. पिंपरी मतदार संघ हा आरपीआयचा बालेकिल्ला आहे. २०१४ च्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारास ४८००० हजार मते मिळाली होती. फक्त २७०० मताने आमचा पराभव झाला होता. यावेळेस पक्षाने मतदारसंघात चांगली बांधणी केली अाहे. त्यामुळे पिंपरी मतदारसंघ हा आरपीआयला सोडावा. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पिंपरी मतदार संघात जे ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे, त्यात आरपीआयचा सिंहाचा वाटा आहे. महायुतीमध्ये जर पिंपरी मतदारसंघाची जागा शिवसेनेस गेल्यास आरपीआय या मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही असा इशारा शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी दिला आह