पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय पाठिंबा असलेले उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार स्ट्रार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे मैदानात उतरले आहेत. चिंचवड मतदारसंघात आज डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत भव्य टु-व्हिलर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दि.१५ रोजी सायंकाळी ७ वाजता शिवाजी पुतळा डांगे चौक येथून या रॅलीची सुरुवात होणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय पाठिंबा असलेले उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. “विकासाची चाहूल फक्त राहुल” असा नारा देत सर्व पक्षांनी कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार स्ट्रार प्रचारक डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत चिंचवड मतदार संघात भव्य टु-व्हिलर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पुतळा डांगे चौक येथून या रॅलीची सायंकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. दत्तनगर, प्रसुन्न धाम, बारणे कॉर्नर, थेरगाव गावठाण, मंगलनगर, शिव कॉलनी, पिंक सिटी, म्हातोबा चौक, छत्रपती चौक, मानकर चौक आणि त्यानंतर विशालनगर येथे या रॅलीची सांगता होणार आहे.