पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रात एकूण २८८ आमदार आहेत पण महेश लांडगे यांच्यासारखा दिलदार आमदार कधी पाहिला नाही असे मत हभप समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी व्यक्त केले. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे निवृत्ती महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दरम्यान या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

यावेळी निवृत्ती महाराज म्हणाले, आपला माणूस मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे. आपल्या माणसांचा अभिमान बाळगत चला. संपूर्ण राज्यात दुष्काळ होता परंतु पुणे जिल्ह्यात कधी जाणवला नाही. कारण हि संतांची आणि थोर राजे-महाराजाची भूमी आहे. त्यामुळे या पवित्र भूमीत कधीच संकट येणार नाही. अथांग जमलेला जनसमुदाय हीच लांडगे यांची खरी संपत्ती आहे. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी संकल्प करा, नद्या स्वच्छ ठेवा, वृक्षारोपण करा, अवयव दान करा, परिसरातील मंदिरे स्वच्छ ठेवा आणि स्वताचे जीवन आदर्श करा. आणि सर्वांनी हे संकल्प केले तर हीच खरी महेश दादांना शुभेच्छा असेल.
महेश लांडगे यांचा दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रमाने वाढदिवस साजरा केला जातो. दरवर्षी त्यांचा वाढदिवस म्हणजे मतदार संघातील नागरिकांसाठी एक प्रकारचा उत्सवच असतो. त्यामुळे लांडगे यांचे कार्यकर्ते व मित्र परिवार महिनाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. हे वर्ष त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचे आणि शुभ संकेत देणारे ठरले आहे. त्यांच्या वाढदिवशीच त्यांना आमदारकीची शपथ घेण्याचा योग आला. विधानसभा सभागृहात देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.






















Join Our Whatsapp Group