पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘रनथॉन ऑफ होप-हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारों स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. २१ किमी सर्वसाधारण पुरुष गटात दादासाहेब वायभाय, महिला गटात रेशमा केवटे, २१ किमी वय ४५ वरील पुरुष गटात रवी कलशी, अंजली भलिंगे हे विजेते ठरले. तसेच १० किमी अंतर वय ४५ वरील पुरुष गटात दीपक ओच्छानी तर महिला गटात बाला मंडल यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
गुलाबी थंडीत धावली हजारो पावले..!
ही स्पर्धा निगडी प्राधिकरणातील सिटी प्राईड शाळेसमोरील मैदान येथून सुरुवात व तेथेच सांगता करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष विजय काळभोर उपस्थित होते.
यावेळी आयुक्त बिष्णोई यांनी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावेत असे आवाहन करीत महिला सुरक्षेची शपथ दिली. तसेच वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. सदरील स्पर्धा महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने संपन्न झाली.
या स्पर्धेत ३ हजार शालेय विद्यार्थी, ३ हजार औद्योगिक क्षेत्रातील, सर्वसाधारण गटातून १५०० जणांनी सहभाग नोंदवला. असे सुमारे ८ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी प्रथमच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत पुरुष व महिलांसाठी २१ किमी,१० किमी,५ किमी अशा चार गटांची विभागणी करण्यात आलेली आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना टी-शर्ट, पदक, प्रमाणपत्र, अल्पोपहार देण्यात आला. या व्यतिरिक्त कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचारी वर्गासाठी विशेष ५ किमी स्पर्धेत
या स्पर्धेत प्रत्येक गटातून ३ विजेते घोषित केले. २१ किमी गटासाठी पहिले बक्षीस २५ हजार,दुसरे बक्षीस १५ हजार, तर तिसरे बक्षीस १० हजार आहे. एकूण बक्षिसाची रक्कम ४ लाख बक्षिसे देण्यात आले. या स्पर्धेतून उपलब्ध होणाऱ्या निधीतून रोटरी क्लब निगडीच्या माध्यमातून गरिबांवर मोफत शस्त्रक्रिया, हॅपी व्हिलेज, शौचालय, शैक्षणिक साहित्य वाटप जलसंधारण योजना, जलसाठा अशा योजना राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष काळभोर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देशमुख तर आभार विजय काळभोर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबच्या सचिव प्रणिता आलूरकर, नियोजित अध्यक्ष डॉ. प्रवीण घाणेगावकर, माजी अध्यक्षा डॉ. शुभांगी कोठारी, सुहास ढमाले, केशव मनगे, साधना काळभोर, यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच वाहतूक पोलीस, पोलीस नागरीक संघटना आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघ व शालेय ढोल लेझीम पथक यांचे सहकार्य लाभले.
अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय सविस्तर वेळेसह निकाल पुढीलप्रमाणे –
२१ किमी सर्वसाधारण वय १८-४५ पुरुष गटात
दादासाहेब वायभाय (नाशिक १:९:१), कमाली लोटे (नाशिक- १:१०:४), रोहिदास भोंबे (१:१२:४), महिला:- रेश्मा केवटे (सातारा २:४१:३), विनया मालुसरे (पुणे १:४२:१),परिणीता शेंडे (१:४२:१)
२१ किमी वय ४५ वरील पुरुष
रवी काळशी (१:२५:७), पांडुरंग पाटील (१:२७: १४), संपत दास (१:३०:४९)
महिला गटात अंजली भलिंगे (१:१२:२९), सौ. शैला (१:५७:५१), सुमित्रा जोशी (१:५७:५५)
१० किमी वय ४५ वरील पुरुष
दीपक ओच्छानी (३९:५४), विश्वास चौगुले (४१:१३), रविंदर पाल (४३:२९)
महिला – बुला मंडल (५६ मिनिटे), गीता चतुर्वेदी (१:०४:२१), मोनिका सिंग (१:१२:३८)
१० किमी सर्वसाधारण गटात पुरुष
दिनकर महाले (३२:५०:१), पोराजी गायकवाड (३३:२६:२), दयानंद चौधरी (३३:३६:१)
महिला – प्रियांका चावरकर (४०:२६), वृषाली उत्तेकर (४१:१६), कुसुमा मावसकर (४७:१२)
५ किमी सर्वसाधारण गटातील पुरुष
नवीन हूडा (हरियाणा २०:४५:२), संजय कांबड (बेंगलोर २०:४६:५), अभिजीत बोंद्रे (२१:०५:०५)
महिला – पदमा कारंडे (पुणे, २२:१२:९), विमल कसदेकर (पुणे,२२:३१:७), बाबीता भुसम (२२:५१;२)
३ किमी विद्यार्थी गटात मुले
केशव माने (सांगली,९:५५:६),
ऋषिकेश रेड्डी (देहूरोड,१०:३२:७),
ओमकार पाटील (१०:३९.६),
मुली – शीतल भगत (११:१४:५), वेदश्री लोणारी (११:१७:९), निकिता भोंगार्डे (२१:५२:.४)
२ किमी गटात मुले
केशव पन्हाळाकर (६:१३.७), करण भोई (२६:२३.९), रोहित वर्मा (६:३१.९)
अंजली वायस आणि (७:८:२), किमया खेडेकर (७:२०.०४), पायल हरपले (७:३३:५)
औद्योगिक सांघिक गटात
ओर्लिकॉन ब्लेझर्स, जनरल इलेक्ट्रिक,
एंप्रो या संघाना बक्षीस देण्यात आले.