पिंपरी (Pclive7.com):- जेव्हा रिक्षा परमिटकरिता अर्जदार अर्ज करत असतो. त्यावेळेस त्या अर्जदाराला लायसन नंबर टाकणे बंधनकारक असते. परंतु लायसन नंबर टाकताना MH १४ नंतर एक स्पेस न दिल्याने अर्ज बाद केला जातो व पुन्हा तोच अर्ज भरण्यासाठी अर्जदाराला ६५० रुपये पावती करावी लागते. म्हणजेच एका अर्जसाठी दोनदा फी आकारली जाते. अर्जदार मुळातच दुसऱ्याची रोजनदारी करून तांत्रिक चुकीमुळे भुर्दंड भरतो.
तरी RTO प्रोटोलवरील स्पेसचा पर्याय काढून टाकावा व त्यामुळे अर्जदाराला पुन्हा पावती करावी लागणार नाही असे निवेदन पिंपरी चिंचवड चे RTO चे अधिकारी इंगळे यांना देण्यात आले. यावेळी पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, अजिंक्य रिक्षा संघटनाचे संजय गरुड, प्रमोद गायकवाड, अप्पा सुरवसे उपस्थित होते.