पिंपरी (Pclive7.com):- गीता जयंती व शौर्य दिनाचे औचित्य साधून विहिंप, बजरंग दल, मोशी प्रखंड कार्यालय व विहिंप, बजरंग दल मोशी प्रखंड संचलित स्व. नारायणराव उर्फ भाऊ बोराटे सेवा प्रकल्प विभाग कार्यलयाचे उद्घाटन विहिंप मुंबई क्षेत्र गोरक्षा प्रमुख, भाऊरावजी कुदळे व आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी श्री सत्यनारायण महापुजा आयोजन करण्यात आली होती. उद्घाटन सोहळ्यास विहिंप, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सह मंत्री विवेकजी कुलकर्णी, जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, बजरंग दल प्रांत संयोजक लहुजी धोत्रे, चिंचवड विभाग संयोजक संदेशजी भेगडे, जिल्हा मंत्री नितीनजी वाटकर, जिल्हा संयोजक नानाभाऊ सावंत, रा.स्व.संघ जिल्हा कार्यवाह विलासजी लांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मोशी प्रखंड कार्यालय व सेवा प्रकल्प कार्यालयात “सेवा, सुरक्षा, संस्कार” अंतर्गत आरोग्य सेवा, आरोग्य शिबीर, सत्संग, कार्यकारीणी एकत्रित बैठका, समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले गेले पाहिजेत असे उद्घाटन प्रसंगी बोलताना भाऊरावजी कुदळे म्हणाले. तसेच कार्यालयासाठी अर्जुन बोराटे यांनी जागा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतवतीने पिंपरी चिंचवड जिल्ह्यात हितचिंतक नोंदणी अभियान (सदस्य नोंदणी) राबविण्यात येत असून या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक प्रखंडात तीन वर्षांतुन एकदा सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येते. यावर्षी देखील या अभियानाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सर्व नागरिकांना जाहीर आव्हान करण्यात येते की पंधरा वर्षपुढील पुरुष व महिला सदस्य नोंदणी करून विश्व हिंदू परिषदेचे सदस्यत्व स्वीकारून देव, देश, धर्मकार्यात सहभागी व्हावेत असे आव्हान भाऊरावजी कुदळे यांनी केली.
मोशी प्रखंडाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक प्रखंडांत असे कार्यलय झाले तर विहिंप, बजरंग दलाच्या कार्याला आणखी चांगला वाव मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कामकाज चालू राहील असे मनोगत व्यक्त करताना नितीनजी वाटकर म्हणले. यावेळी या कार्यक्रमास विहिंप सहमंत्री संजयजी शेळके, सहमंत्री धनंजय गावडे, जिल्हा संयोजक संभाजी बालघरे, जिल्हा सह संयोजक सागर चव्हाण, बजरंग दल जिल्हा सह संयोजक अभिजीत शिंद गोरक्षा प्रमुख मंगेश नढे, जिल्हा सेवा विभाग प्रमुख गोडबोले काका व मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील मान्यवर व विहिंप, बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल गोसावी यांनी केले तसेच प्रखंड मंत्री सतीश फापळे, प्रखंड सहमंत्री योगेश सस्ते, प्रखंड संयोजक अनिकेत सस्ते, प्रखंड सह संयोजक दीपक ढोकले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विहिंप, बजरंग दल, पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील श्री क्षेत्र टाळगाव चिखली प्रखंडाचे विस्तार करून प्रखंड कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा प्रचार व प्रसिद्धी प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी दिली.