पिंपरी (Pclive7.com):- लोकप्रिय नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्राधिकरण येथील मदनलाला धिंग्रा मैदानावर भव्य फुलपिच ‘डे-नाईट टेनिस बॉल’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज झाले. पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते हा उद्घघाटन सोहळा संपन्न झाला. दि.११ ते १५ डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन माजी उपमहापौर, नगरसेवक राजू मिसाळ यांनी केले आहे.

या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, रोटरीचे माजी अध्यक्ष सुभाष सिंघानिया, उद्योगपती लक्ष्मण कातोळे, एलआयसीचे प्रमुख तात्या शेवाळे, डीजे ग्रुपचे अध्यक्ष उद्योजक दिपक जाधव, मिलींद चौधरी, किर्तीभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानात ‘बॉर्न क्रेझी’ आयोजित ‘कै.संदिप मेमोरीअल कप २०१९’ या क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम सुरू झाला आहे. दि.११ ते १५ डिसेंबर या कालावधीत ‘डे-नाईट’ स्पर्धा येथे होणार आहेत. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकविणाऱ्या संघाला १,५०,००० रूपये व चषक, द्वितीय पारितोषिक १,००,००० रूपये व चषक, तृतीय पारितोषिक ७५,००० हजार व चषक, चतुर्थ पारितोषिक ५०,००० रूपये व चषक असणार आहे. या स्पर्धेमध्ये खेळणारे एकुण संघ लिग पध्दतीने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने आठ षटकांचे असतील. यात प्रत्येक सामन्याला सामनावीरचा किताब दिला जाईल. या स्पर्धेत ‘मॅन ऑफ द सिरीज’ खेळाडूला आकर्षक टू व्हीलर बाईक बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. मैदानात प्रेक्षकांसाठी २ एल ई डी स्क्रीन लावण्यात आले असून श्री लाईव्ह चॅनेल ३ केमेरे याठिकाणी आहेत. या स्पर्धेसाठी मुंबई पालघरचे नामवंत समालोचक चिरागजी मेहेर आणि प्रशांतजी आगाडे सर समालोचनाची जबाबदारी पार पाडणार आहेत.





















Join Our Whatsapp Group