पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयातील कार्यालयीन सचिव रामदास मोरे (वय ६५) यांचे आकस्मित निधन झाले आहे. त्यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज दि.२ जानेवारी रोजी घडली असल्याची माहिती मिळाली आहे.
मोरे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतू त्यांच्या या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सायंकाळी ५ वाजता खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर लिंक रोड येथे अंत्यविधी होणार आहेत.



















Join Our Whatsapp Group