
पिंपरी (Pclive7.com):- युवा खेळाडूंमुळे देशाचे नाव मोठे होत असते. खेळामुळे राष्ट्रीय एकतेची भावना निर्माण होण्यास मदत होते. या मुलांमधूनच मोठे खेळाडू तयार होऊन राज्याचे व देशाचे नेतृत्व करतात. देशाचे नावलौकिक वाढवतात. युवा खेळाडू हे देशाचे उज्वल भविष्य असल्याचे मत शिवसेनेच्या जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे व अविनाश बाहारे यांनी फ्रेंड्स बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र चालू केले आहे. यामध्ये मुलांना व मुलींना मोफत शिक्षण दिले जाते. आज पिंपरी युवासेनेच्या निलेश हाके यांच्या पुढाकाराने शिवसेना जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे यांच्या हस्ते ५० युवा खेळाडूंना टि-शर्टचे वाटप करण्यात आले.
युवा खेळाडूंमुळे देशाचे नाव मोठे होत असते. खेळामुळे राष्ट्रीय एकतेची भावना निर्माण होण्यास मदत होते. या मुलांमधूनच मोठे खेळाडू तयार होऊन राज्याचे व देशाचे नेतृत्व करतात. देशाचे नावलौकिक वाढवतात. म्हूणनच बालवयापासूनच मुलांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. आज या प्रशिक्षण केंद्रामुळे मुलांच्या कलागुणांना चालना मिळणार आहे. बालवयापासूनच ह्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते भविष्यात चांगली कामगिरी करतील असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे, रामभाऊ उबाळे, युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, डॉ. बाहेती, राहुल धोत्रे, अविनाश बाहारे, विकास गायकवाड, सचिन कोष्टी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group