पिंपरी (Pclive7.com):- कै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन मोरवाडी येथील रॉक गार्ड, नाना-नानी पार्क हॉल येथे रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत करण्यात आले असल्याची माहिती संयोजक ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष दीपक भोजने यांनी दिली.
या शिबिरामध्ये महिला व पुरुषांची सामान्य तपासणी, डोळे तपासणी, बालक दंत तपासणी या शिबिरात मोफत करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या संयोजनात आरंभ सोशल फाउंडेशन, स्वराज ग्रुप म्हाडा, विघ्नहर्ता प्रतिष्ठान मोरवाडी, मैत्री बौध्द विहार, ओंकार मित्र मंडळ, मनित मित्र मंडळ म्हाडा सोसायटी, म्हाडा मोरवाडी मित्रपरिवार, पीसीसीए ग्रुप तसेच ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबीरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांनी नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, दीपक भोजने – 7387407825,
रेणुका भोजने – 9307552061,
गजानन पाटील – 9604717678,
विजय भोजने – 9922501768,
नंदकुमार काळे – 8459990745.