पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा व विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्य शहनाज कोटार यांच्या हस्ते सी.वि.रमण यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य अर्चना करंडे, मनिषा घोसर्वडे, पुजा लोबो, नशिता शेख सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रश्नमंजुषा कार्यक्रानिमित्त विद्यार्थांना सौर ऊर्जा, तंत्रज्ञान व वायु प्रदुषण, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक रोबोट, रॉकेट लॉन्च आदी विषयावर मुलांना प्रश्न विचारण्यात आले. या प्रदर्शनमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे विज्ञान प्रयोग सादर केले होते. त्यात सौर ऊर्जा वापर, ग्लोबल वॉर्मिग, मोटार कार, इलेक्ट्रिक रोबोट, रॉकेट लॉन्च, प्रोजेक्टर इत्यादी प्रयोग सादर केले होते.