
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती महाराष्ट्रासह सर्व देशांवर ओढवली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रक्कम देऊन साजरा केला. पिंपरी युवासेनेकडून अकरा हजार रुपयांची ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस निलेश हाके यांनी दिली.
रक्कमेचा धनादेश सौ. सुलभाताई उबाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी रामभाऊ उबाळे, युवासेनाचे कुणाल जनगाडे, किशोर शिंदे, प्रमोद गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचतगटाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ काची यांनी केले होते.























Join Our Whatsapp Group