
पिंपरी (Pclive7.cm):- देशात कोरोना विषाणूचा हाहाकार पसरला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णाची संख्या १२ वर पोहोचली आहे. उपाययोजना म्हणून सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहातील नागरिकांसाठी पाणीपट्टी, कर संकलनाची तसेच बांधकाम विभागाची बिले भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हि बिले भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशा मागणीचे निवेदन उपमहापौर तुषार हिंगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.
सध्या मार्च महिना चालू असून महानगरपालिकेची पाणीपट्टी, करसंकलन, बांधकाम विभाग अशी अनेक बिले भरण्याची मुदत दि.३१ मार्च पर्यंत असते. त्यामुळे बिले भरण्यासाठी अनेक नागरिक पालिकेच्या कार्यालयात ये-जा करताना दिसत आहेत. नागरिकांची गर्दी म्हणजेच कोरोनाचा धोका अधिक, तसेच बिले भरण्याची कामे घरातील वयस्कर मंडळी करतात. त्यामुळे धोका अधिक असतो. पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व बिले भरण्याची मुदत दोन महिने वाढविण्यात यावी. तसेच नागरिकांना बिले भरण्यासाठी ऑनलाईनचा वापर करण्याचे महापालिकेतर्फे आवाहन करण्यात यावे, अशी मागणी तुषार हिंगे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group