पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रहाटणी गावातील भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष देवा नखाते यांनी स्वखर्चाने संपूर्ण प्रभागातील सोसायट्या तसेच कॉलनींमध्ये ‘सॅनीटायझर’ फवारणी केली आहे.
सध्या राज्यासह देशावर कोरोनाचं संकट ओढावलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातही सुरूवातीला कोरोनाचे रूग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात औषध फवारणी केली जात आहे. परंतू प्रशासनाला सर्वच ठिकाणी पोहचणे शक्य होत नाही. म्हणूनच महापालिकेच्या यंत्रणेची वाट न पाहता रहाटणी गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष देवा नखाते यांनी स्वखर्चाने संपूर्ण प्रभागात ‘सॅनीटायझर’ फवारणी केली आहे. रहाटणी गावठाण, गंगा नगर, पवना नगर, आशिर्वाद कॉलनी, प्रसन्न कॉलनी, अंकुर कॉलनी, लक्ष्मी-भक्ती सोसायटी, सिद्धीविनायक सोसायटी, साई शिवम् सोसायटी, अँपल आयकॉन सोसायटी आदी परिसरात ही फवारणी करणार आली आहे. पुढील काही दिवसातच उर्वरित भागातही ‘सॅनीटायझर’ फवारणी करण्यात येणार आहे.





















Join Our Whatsapp Group