पिंपरी (Pclive7.cm):- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्ये देखील याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या काळात ज्या गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे अशांना राकेश विजय वाकुर्डे युवा मंचच्यावतीने मदतीचा हात दिला आहे.
शहरात अत्यावश्यक सेवा पुरविणारे कर्मचारी, बेघर आणि गरजू लोकं उपाशी राहू नये म्हणून या युवा मंचच्यावतीने फुड पॅकेट्स व मास्क, हॅन्डग्लोज वाटप करण्यात येत आहे. तरी कोणालाही जेेेवनाची आवश्यकता असेल त्यांनी राकेश विजय वाकुर्डे युवा मंचाला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :-८६९८८५१६८५, ९१७५११०९०९, ९६५७७०९०९०, ८००७०६१३१२





















Join Our Whatsapp Group