पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील झोपडपट्टीतील नागरीकांना कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येक झोपडीधारकास ४ मास्क व २ साबणाच्या कीटचे लवकरच मोफत वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी आज आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य विलास मडिगेरी, वैदयकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय आदी उपस्थित होते. कोरोना विषाणु संसर्गाचा आजार व प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरातील सर्व झोपडीधारकांच्या कुंटंबाची स्वच्छता ठेवण्यास मदतच होणार आहे. त्याचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group