पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत नवीन ०४ ने वाढ होऊन आजपर्यंत एकुण ३५ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. या पैकी १२ रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित १९ रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल असून रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच एकुण ३५ रुग्णांपैकी ३ रुग्ण हे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील असुन ते सद्यस्थितीला पुण्यातील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आज (दि.१३) दिली. दरम्यान रविवारी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या २१५५ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि.१३/०४/२०२० पर्यंत एकुण ८८१ व्यक्तींचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर ७९० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज दि.१३/०४/२०२० रोजी एकुण ५९ व्यक्तींना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या १६० कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. आज दि.१३/०४/२०२० अखेर शहरातील कन्टेंनमेंट झोन मधील ४३८०४ नागरिकांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड मनपामध्ये आजपर्यंत २१५५ व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. घरातील अलगीकरणात असणा-या नागरिकांनी बाहेर पडू नये. अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ यावर कळवावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे. कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी यासाठी महापालिकेच्या दवाखाने व रुग्णालये याठिकाणी स्वतंत्र बाहय रुग्ण विभाग कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचचव शहरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकिय व्यवसायिक यांना त्यांचे रुग्णालया बाहेरील स्वतंत्र मोकळया हवेशीर ठिकाणी सर्दी, ताप, खोकला असणा-या रुग्णांसाठी वेगळा बाहयरुग्ण विभाग उभारण्यात यावा असा आदेश देण्यात आलेला आहे. पिं.चिं. मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा WhatsApp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group