पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या वतीने प्रभागातील १५ हजार कुटुंबाना सॅनिटायझर आणि चार मास्कचे वाटप करण्यात येत आहे.
पिंपळे सौदागर प्रभागात गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या मोठी आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रत्येक सोसायटीत जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधत घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नका, असेही त्यांनी नागरिकांना विनंती केली आहे.
नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनकडून १५ हजार कुटुंबांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

























Join Our Whatsapp Group