पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच आधुनिक पध्दतीच्या ‘सॅनिटायझर स्टॅन्ड’चे राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा वर्षा जगताप यांच्यावतीने हे ‘सॅनिटायझर स्टॅन्ड’ संत तुकारामनगर येथील पोलीस चौकीस उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच शहरातील अनेक रहदारीच्या ठिकाणी हे स्टॅन्ड उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
यावेळी माजी महापौर योगेश बहल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, सुधीर चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, रमेश केंगार पोलीस उपनिरीक्षक, सतेश जाधव पोलीस उपनिरीक्षक, पालवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, बंडू खाडे पोलीस नाईक, तसेच बाळासाहेब जगताप, सुनील जगताप उपस्थित होते.
सध्या संपूर्ण जगात, देशात व महाराष्ट्र राज्यात देखील COVID 19 कोरोनाची फार मोठी साथ आहे. यामध्ये डाॅक्टर, नर्स, कर्तव्यदक्ष पोलिस वर्ग व सफाई कर्मचारी हे खरे देवदूत आहेत. म्हणूनच रात्रंदिवस या युद्धात झटत असणारे पोलिस कर्मचारी हे दुसऱ्यासाठी मदतकार्याचे कार्य पार पाडत असताना काहींना कोरोनाची बाधा होऊन आपले प्राणही गमवावे लागले आहेत. खरतर हे सगळे करत असताना स्वच्छता आणि सोशल डिस्टंस असणे महत्त्वाचे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा वर्षा जगताप यांनी प्रथमच शहरात अत्याधुनिक आधुनिक पध्दतीचे ‘सॅनिटायझर स्टॅन्ड’ लावले आहेत. त्याप्रकारचे ‘सॅनिटायझर स्टॅन्ड’ संत तुकारामनगर येथील पोलीस चौकी याठिकाणी त्यांंनी उपलब्ध करून दिले आहे. तसेच शहरातील अनेक रहदारीच्या ठिकाणी हे स्टॅन्ड उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
वास्तविक पाहता राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी सामाजिक भान राखून या आधीही समाजातील अनेक गोरगरिब लोकांना अन्नदान, काही सफाई कर्मचारी लोकांना व पोलिस कर्मचारी वर्गाला होमिओपॅथीकच्या आर्सेनिक ह्या गोळ्यांचे वाटप तसेच सॅनिटायझर किटचे वाटप, परगावी जाण्यासाठी सहकार्य देखील केले आहे.

























Join Our Whatsapp Group