पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना सत्ताधारी भाजपकडून स्विपर टेंडर प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शहरातील रस्त्यांचे यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छता करण्याचे टेंडर वादग्रस्त ठरलेल्या या टेंडरवरून अनेक आरोप झाले होते. शहरात आजवर कोरोनाचे २०४ रुग्ण आढळले आहेत. या संकटकाळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, पालिका प्रशासन यांच्या इतकेच सफाई कर्मचार्याचे मोठे योगदान आहे. या स्विपर टेंडर प्रक्रियामुळे कोरोना महामारी संकटात अत्यंत दुर्देवी परिस्थितीत ज्या ११५० सफाई कर्मचाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी कुटूंबाची पर्वा न करता सांभाळली. या लोकांचीच नोकरी धोक्यात येणार असल्याने ‘भ्रष्टाचारी स्विपर टेंडर’ प्रक्रिया रद्द करून त्या सफाई कामगारांना महापालिकेत कायमची नोकरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
निवेदनात काटे यांनी म्हटले आहे की, शहरात उद्योगधंदे बंद असल्याने लोकांच्या हाताला काम नाही. जनतेला पालिकेकडून शक्य होईल तेवढ्या सुविधा पुरविल्या पाहिजेत. मात्र सामान्य जनतेच्या सुखापेक्षा सत्ताधारी भाजपकडून महापालिकेला ओरबडून खाण्याची वृत्ती अधिक आहे. महापालिकेने रस्ते सफाईचे ७४५ कोटी रुपयांचे टेंडर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. या प्रक्रियेत मनमानी पद्धतीने अटी व शर्ती बदलणे, सत्ताधारी पक्षाचे नेते हस्तक्षेप केला होता. भ्रष्टाचार आणि सत्ताधाऱ्यांची मनमानी यामुळे गत आर्थिक वर्षात हे टेंडर स्थगित केले होते आता ते कायमस्वरूपी रद्द करावे. हा पैसा शहरातील कोरोनाच्या माहामारीत अडकलेल्या पिंपरी चिंचवडकरांच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावा अशी मागणी काटे यांनी केली आहे.
त्या ११५० सफाई कर्मचाऱ्यांना न्याय द्या..
कोरोना महामारी संकटाच्या महामारीत ज्या ११५० सफाई कर्मचाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी कुटूंबाची पर्वा न करता सांभाळली. या सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायमची नोकरी द्यावी. त्याचबरोबर साफसफाई कामात आणखी नव्याने कामगार भरती करावेत. महापालिकेने रस्ते सफाईचे ७४५ कोटी रुपयांचे टेंडर रद्द करून या संपूर्ण प्रक्रियाची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

























Join Our Whatsapp Group