पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिने आज तिच्या वाढदिवसानिमित्त वायसीएम हॉस्पिटल ला 95 पीपीई किटस् दिले. तिचे वडील मनोहर कुलकर्णी, भाऊ अतुल कुलकर्णी व कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी वायसीएम हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे, व भांडार व्यवस्थापक राजेश निकम यांना प्रत्यक्ष भेटून हे किटस् त्यांच्याकडे सुपूर्त केले.
सोनाली कुलकर्णी लॉकडाऊनमुळे दुबई येथे अडकल्यामुळे ती प्रत्यक्ष येऊ शकली नाही. परंतु वाढदिवसानिमित्त जे खरे वॉरियर्स आहेत. त्यांचे रक्षण व्हावे या हेतूने मी हे किटस् देत आहे. तसेच मी पिंपरी चिंचवडची रविवारी रहिवासी असल्याने व पिंपरी चिंचवड महानगरपालिका सध्या कोरोनाच्या संकटकाळामध्ये अत्यंत चांगले काम करत असून वायसीएम हॉस्पिटलमध्ये सर्व पेशंटची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. त्यामुळे मी ही माझी जबाबदारी समजून छोटीशी मदत करीत आहे. हे किट देताना माझे सहकारी कलाकार यांनीही मला मदत केली आहे. सोनालीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच सहाय्यक आयुक्त अजित पवार व कलारंग संस्थेचे अमित गोरखे यांचेही आभार मानले आहेत.

























Join Our Whatsapp Group