पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात मागील ५० दिवसांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. यामुळे हजारो कामगार, विद्यार्थी व परप्रांतीय शहरात अडकून पडले आहेत. काही परप्रांतीय कामगार पायी चालत निघाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात परप्रांतीयांसह राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. अनेकांना आपापल्या मूळगावी परतायचे आहे. परंतु, गावी जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे त्यांना शहरात अडकून पडावे लागले. यात तळवडे प्रभागातील परिसरातील नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी मूळगावी जाण्याची इच्छा असणाऱ्या परप्रांतीयांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची यादी बनवून स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर यांनी देहूरोड, चिखली पोलिस व पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या मदतीने पुढाकार घेत इतर राज्यातील शेकडो लोक आप-आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत.
पंकज भालेकर पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे व लॉकडाऊनमुळे बाहेरच्या राज्यातून आलेले अनेक परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी पिंपरी चिंचवड शहरात अडकून पडले आहेत. त्यातील अनेकांना आपापल्या मूळगावी परतायचे आहे. परंतु, जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे हे नागरिक शहरात अडकले आहेत. देहूरोड, चिखली पोलिस व महापालिका प्रशासनाच्या मदतीने या सर्व नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी पासची कार्यवाही युद्धपातळीवर करून त्यांना गावी जाण्यासाठी सरकारी, खाजगी बसेस उपलब्ध करून दिल्या. त्यांना सुरक्षित वावराचा अवलंब करा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे. तसेच सॅनिटायझरसह सुरक्षा साधनांचा वापर करून खबरदारी घ्या, असेही बजावले.
या मदतकार्यात देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानेंसाहेब, तळवडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप भोसले, रणजित भालेकर, अमर काळोखे, मछिंद्र भालेकर, शांताराम कामठे, सचिन कुडपणे, रमेश बाठे, सुनील भालेकर, उमेश जामदार, शांताराम कामठे, नवनाथ मेमाणे, गोवर्धन चौधरी, श्रीपती मालुसरे, अनिल मालुसरे, टकले ताई, प्रमोद पायगुडे, प्रवीण पिंजण, उमेश जामदार, सुनीता काळोखे, राहुल भालेकर, पांडुरंग भालेकर आदी कार्यकर्त्यांनी सर्व नागरीकांची आरोग्य तपासणी व पास उपलब्ध करून त्यांना गावी जाण्यासाठी वाहनांची सर्व जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली. पंकज भालेकर मित्र परिवार, कार्यकर्ते व आदींनी सर्वाधिक परिश्रम घेतले आहे.