पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. आज (दि.१८) दिवसभरात सर्वाधिक २२ रूग्ण आढळले आहेत. यात ११ पुरूष आणि ११ महिलांचा समावेश आहे. तर एकट्या आनंदनगरमध्ये १८ ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंतचे सर्वाधिक कोरोनाच्या रूग्ण संख्येने रेकॉर्ड केले आहे. दिवसभरात तब्बल २२ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. तर चिंचवडमधील आनंदनगर परिसरात १८ बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज आनंदनगर १८, भाटनगर १, रहाटणी १, दिघी १ आणि भोसरीमध्ये १ ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण सापडले आहेत. शहरात सध्या ८० रूग्ण असून आजपर्यंतच्या बाधित रूग्णांची संख्या २२६ वर पोहचली आहे. दरम्यान आज ६ रूग्णांना डिस्चार्ज दिला असून आजअखेर शहरातील १३१ रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. तसेच शहरातील चार जणांचा आणि शहराबाहेरिल ८ जणांचा आत्तापर्यंत उपचारा सुरू असताना मृत्यू झाला आहे.
दरम्यान आज इंदिरानगर चिंचवड, मोशी, रुपीनगर, संभाजीनगर, गणेशनगर तळवडे व मधुबन सोसायटी सांगवी येथील रहिवासी असलेले ०६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
शहरातील खालील भागात कोरोनाचे रूग्ण आढळल्याने येथील परिसर आज रात्री ११ वाजल्यापासून सील करण्यात येणार आहे.
०१) अमृतधारा, दिघी येथील (विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर – अर्जुन जिम – ओयो होम – जेनेसिस च-होली समोर – आळंदी रोड – ममता स्वीट्स – विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर)
०२) मोरेवस्ती, चिखली येथील (ओम मिनी मार्केट – अष्टविनायक चौक – एक्सीस बँक एटीम – तुषार पान सेंटर समोर – बिस्मिला चिकन शॉप समोर – कल्पना टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स – ओम मिनी मार्केट )
०३) भाटनगर, पिंपरी येथील (किर्वे टेलर समोर – रेल्वे लाईन – राधिका अपार्टमेंट – रेल्वे लाईन – डायमंड स्पोर्टस – लिंक रोड – किर्वे टेलर समोर)
०४) ज्ञानंगगा सोसयटी, रहाटणी येथील (श्री गार्डन टी स्पॉट – निर्मल बंगला – आर.आर.जी.२ सोसायटी रोड – रॉयल रहार्डका ग्रीन्स फेज २ – रॉयल ऑरेंज कांऊटी रोड – ज्ञानगंगा सोसयटी रोड – श्री गार्डन टी स्पॉट)
०५) हनुमान कॉलनी, भोसरी येथील (फॅन्सी काम्प्युटर पेरिफेरल्स – दुर्गामाता मंदिर – राजगुरु बँक समोर – फॅन्सी काम्प्युटर पेरिफेरल्स)























Join Our Whatsapp Group