पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या महासंकटात पहिल्या दिवसापासून पिंपरी युवासेना मैदानात उतरली आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारकडून मदतकार्य सुरू असून युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके एका ‘योध्दा’ प्रमाणे लढत आहे. गरजूंना शिधा, धान्य वाटप तसेच सुरक्षेसाठी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप त्यांच्याकडून केले जात आहे. आता मूळगावी कर्नाटकला जाणाऱ्या परप्रांतियांसाठी अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
सध्या देशात सगळ्यात जास्त फरफट कोणाची चालू असेल तर ती म्हणजे काम, धंद्यासाठी, शिक्षणासाठी स्वतःच घर सोडून इतरत्र अडकलेल्या लोकांची. फुगेवाडी-दापोडीमध्ये अश्या प्रकारे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. राज्य सरकार मार्फत आज त्यांना मुळगावी कर्नाटकमध्ये पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व यंत्रणा या नागरिकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रवासातील जेवणाची व अल्पोपहाराची सोय पिंपरीयुवासेना व आशीर्वाद महिला संघाकडून करण्यात आली.
ह्यावेळेस भोसरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बनसोडे, युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, शीलामामी जाधव, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र जाधव, मैत्री ग्रुपचे रविंद्र कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मेहबुब शेख, दीपक साळवे उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group