पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे आज (दि.१९) भोसरीतील एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ वर गेली आहे. तसेच आणखी ३ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे.
आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील २२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ८२ जणांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात वास्तव्यास असलेल्या ११ जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १३१ जण करोना मुक्त झाले आहेत.
आज मयत झालेली महिला ही भोसरी परिसरातील आहे. तसेच कोरोना बाधित आलेले ३ रूग्ण रूपीनगर आणि भोसरी परिसरातील असून त्यात १ पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे. तसेच आज शहराबाहेरील आंबेगाव येथील एका पुरूषाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.























Join Our Whatsapp Group