पिंपरी (Pclive7.com):- दि.इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी सीए चंद्रकांत काळे यांची निवड करण्यात आली आहे.
निगडी येथील संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. मावळत्या अध्यक्षा सीए सिमरन लिलवानी यांच्याकडून सीए चंद्रकांत काळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
संस्थेचे नियुक्त केलेल्या अन्य पदाधिकार्यांमध्ये सीए विजयकुमार बामने- उपाध्यक्ष आणि अध्यक्ष विद्यार्थी संघटना, सेक्रेटरी आणि खजिनदार- सीए शैलेश बोरे, मावळत्या अध्यक्षा सीए सिमरन लिलवानी पूर्वाध्यक्ष – सीए संतोष संचेती, कार्यकारी मंडळ सदस्य- सीए पंकज पाटनी आणि सीए सचिन बन्सल यांचा समावेश आहे.
कर विषयक ज्ञान प्रसार, परिसंवाद, कार्य शाळा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि इतर समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबविण्याचा संकल्प असल्याची माहिती अध्यक्ष पदी सी ए चंद्रकांत काळे यांनी दिली.





















Join Our Whatsapp Group