पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलासराव औताडे यांच्या नियुक्ती पत्राद्वारे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी विरेंद्र शिवाजीराव गायकवाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
विरेंद्र गायकवाड हे काँग्रेस पक्षाचे युवा व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते गेल्या १० वर्षांपासून युवक काँग्रेस मध्ये सक्रिय सहभागी आहेत. सध्या ते युवक काँग्रेसच्या शहर सरचिटणीस या पदावर काम करत होते. गायकवाड हे चिंचवड मतदारसंघातील सांगवी या भागात गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबियां समवेत राहतात ते मुळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या मातोश्री सौ.विद्याताई गायकवाड यांनी सुध्दा काँग्रेस पक्षात काम केले आहे व त्या आजही निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्या आहेत, त्यांना टाटा मोटर्स गृहिनी विभागाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे.
विरेंद्र गायकवाड हे उच्चशिक्षित असून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट व केटरींग टेक्नॉलॉजी मध्ये पदवी घेतली आहे. तसेच बिझनेस अडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवीका प्राप्त केली आहे. ते रियल इस्टेट व विमा क्षेत्रातील व्यावसायिक आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांच्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रांताध्यक्ष विलासराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात काँग्रेस पक्ष व सेवादलाचे संघटन वाढीसाठी अथक परिश्रम घेऊन कायम कार्यरत राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाकडून सध्या युवकांना अधिक नेतृत्वाच्या संधी देण्यात येत आहेत काही महिन्यांपूर्वी शहर काँग्रेसच्या सोशल मिडीया विभागाच्या अध्यक्ष पदी आयुष मंगल या युवा पदाधिका-याची ही नियुक्ती करण्यात आली होती.
विरेंद्र गायकवाड यांच्या निवडीने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व या निर्णयाबाबत पक्षश्रेष्ठींचे आभारी असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group