पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात बेड बरोबरच ऑक्सिजनचा देखील मोठा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन पुरवठ्या अभावी रूग्णांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची असेलला गरज ओळखून पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने ऑक्सिजनचा प्लांट उभारावा अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.
यासंदर्भात संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. याबाबत अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणारे कि, पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या व कोरोना मृत्युदर वाढत चालला आहे. यामध्ये रुग्णाला होणारा ऑक्सिजन पुरवठ्या अभावी जीव गमवावा लागत आहे. महापालिकेला ऑक्सिजन मिळत नाही.
ऑक्सिजन घेण्यासाठी प्रशासनाची धावपळ होत आहे. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेने ऑक्सिजन प्लांट युद्धपातळीवर तयार करावा. यातून रुग्णांना दिलासा मिळू शकतो. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा होणारा मृत्यू दर कमी होईल.
राज्यातील काही महापालिकांमध्ये या बाबतची कार्यवाही सुरू आहे. तरी, आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात पिंपरी चिंचवड शहरातील अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील मोकळ्या जागेत युद्धपातळीवर ऑक्सिजन प्लांट प्रकल्प उभा करावा अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group