पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयातील फायर व्यवस्थेचे तात्काळ ऑडिट करावे, असे मागणीचे निवेदन माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयाला आग लागून ११ जणाचा दुर्देंवी मृत्यू झाला होता. तसेच काल वसई विरार येथील रुग्नालयाला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला. ही गोष्ट खूप गंभीर आहे. शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या प्रचंड वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. तसेच बहुतेक रुग्णालयांनी आपल्या रूग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर केले आहे. ज्या ठिकाणी व्हेन्टिलेटर, आय.सी.यु चालु आहे. तेथे कायम स्वरूपी एसी चालु ठेवला जातो. त्यामुळे तेथील एसी व इतर वातानुकुलीत उपकरणाच्या दुरूस्तीकडे काही खासगी रूग्णालये दुर्लक्ष करीत आहेत.
याचा विचार करता अग्निशमन विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खासगी व सरकारी छोट्या मोठ्या रुग्णालयाचे फायर व्यवस्थेचे ऑडिट करण्यात यावे. तसेच या पाहणीमध्ये ज्यांनी योग्य उपाययोजना केल्या नसतील त्यांना योग्य उपाययोजना करण्यास सांगण्यात यावे. किंवा काही गंभीर त्रुटी आढळ्यास रूग्णांचा जिवाशी खेळणाऱ्या त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
तरी आयुक्तांनी या प्रकरणी तात्काळ दाखल घेवुन फायर व्यवस्थेचे ऑडिट करण्याचे आदेश द्यावेत, असेही नाना काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group